| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ ऑगस्ट २०२४
पूर परिस्थितीमुळे 25 जुलै पासून बंद करण्यात आलेली सांगलीतील अमरधाम स्मशान भूमी गुरुवार 8 ऑगस्ट 2024 पासून पूर्ववत सुरू होत आहे. अशी माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. या 14 दिवसाच्या काळात कुपवाड येथील बुधगाव रोड आणि स्वामी मळा येथील स्मशानभूमी 85 अंत्यविधी महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आले.
याबाबत आयुक्त गुप्ता म्हणाले की, 25 जुलै रोजी कृष्णा नदीचे पाणी अमरधाम स्मशानभूमीत आल्याने अमरधाम स्मशानभूमी तात्पुरता स्वरूपात कुपवाड स्वामी मळा येथे स्थलांतरित करण्यात आली. यासाठी कुपवाड बुधगावरोड आणि स्वामी मळा स्मशानभूमी येथे 20 कर्मचाऱ्यांकडून 24 तास कामकाज करण्यात आले. यामध्ये दोन्ही स्मशान भूमीत अंत्यविधी कट्टे एकूण 85 कर्मचाऱ्यांकडून पार पाडण्यात आले. आता कृष्णा नदीची पाणी पातळी उतरण्यास सुरुवात झाल्यामुळे अमरधाम स्मशानभूमीतील पाणी ओसरले आहे. त्यामुळे बुधवारी महापालिका कर्मचाऱ्यांकडून अमरधाम स्मशान भूमीची स्वच्छता करण्यात आली असून सांगलीची अमरधाम स्मशानभूमी गुरुवार 8 ऑगस्ट 2024 पासून पूर्ववत सुरू करण्यात येत आहे असेही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले.