Sangli Samachar

The Janshakti News

महापालिका पथविक्रेता समिती सदस्य निवडणुकीत चार सदस्य विजयी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ ऑगस्ट २०२४
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पथविक्रेता सदस्य 2024 निवडीसाठी शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी सायंकाळी शाळा क्रमांक 3 मध्ये पार पडली . या मतमोजणी मध्ये खुल्या प्रवर्गातून सादिक शब्बीर बागवान आणि अमित महादेव मोतुगडे हे तर खुला प्रवर्ग महिलांमधून श्रीमती बेबी दावल मुल्ला आणि अल्पसंख्यांक गटातून कैस अहमद मुनीर अलगुर हे चार उमेदवार विजयी झाले.

 सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत तीन मतदान केंद्रावर यासाठी सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण झालेल्या मतदानात खुल्या प्रवर्गाचे उमेदवार सादिक शब्बीर बागवान यांना 762 तसेच अमित महादेव मोतुगडे यांना 779 इतकी मते मिळाली तर खुला प्रवर्ग महिला मधून श्रीमती बेबी दावल मुल्ला या 809 मतांनी विजयी झाल्या तर अल्पसंख्यांक गटातून 943 मते घेत कैस अहमद मुनीर अलगुर हे चार उमेदवार विजयी झाले. 


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोजकुमार देसाई यांनी काम पाहिले. उप आयुक्त वैभव साबळे, सहा. निवडणूक अधिकारी सहा. आयुक्त सहदेव कावडे , ज्योती सर्वदे, आमीन, मनपा अधिकारी, कर्मचारी, यांनी मतमोजणी व निकाल इत्यादी कामे यशस्वी केली आहेत.