Sangli Samachar

The Janshakti News

बदलापूर प्रकरणी बातमी देणाऱ्या महिला पत्रकारावर वादग्रस्त नि गलिच्छ टिपणी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० ऑगस्ट २०२४
बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यावर कडी करणारा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही बातमी घेणाऱ्या एका महिला पत्रकाराला उद्देशून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी, "तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे." असे संतापजनक उद्गार काढले असल्याचे समजते. 

बदलापूर शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. ही माहिती कळताच आज सकाळपासूनच आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी आदर्श शाळेसमोर आंदोलन सुरू केले. तर काही आंदोलक बदलापूर रेल्वे स्टेशन येथे पोहोचले. मुंबईहून येण्याजाणाऱ्या दोन्ही बाजूच्या रेल्वे सेवा त्यांनी बंद पाडल्या. स्थानिक पत्रकारांनाही हा विषय उचलून धरला आहे. यामुळे संतापलेल्या या वामन म्हात्रे यांनी सदर महिला पत्रकारावर गलिच्छ शब्दात संताप व्यक्त केल्याने, पत्रकारांसह आंदोलकही अजून आक्रमक झाले. ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांनी याबाबत निषेध व्यक्त केला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील असून त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात हे असे प्रकार घडत असतील तर दाद कोणाकडे मागायची ? असा संतप्त सवाल पत्रकार आणि जनतेतून विचारला जात आहे.