Sangli Samachar

The Janshakti News

भय इथले संपत नाही, वासनांधाच्या कारवाया थांबत नाहीत; बदलापूर येथील शाळेत चिमुकलीवर अत्याचार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० ऑगस्ट २०२४
कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरुद्धा जनक्षोभ निवळत नाही तोपर्यंत, येथील बदलापूरमधील एका सुप्रसिद्ध शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याने बदलापूर संतापाने पेटून उठले आहे.

"ए आई, मला शुच्या जागी मुंग्या चावत आहेत" या तक्रारीनंतर तीन वर्षे आठ महिन्याच्या संबंधित मुलीच्या आईने तिला दवाखान्यात नेले आणि याबाबतचे संतापजनक सत्य समोर आले. बदलापूर येथील आदर्श विद्यालय शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांने वासनेचे बळी बनवले. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक के पीडित चिमुरडीच्या आतड्यापर्यंत दुखापत झालेली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे शिंदेच्या वासनेला, केवळ हीच एकमेव मुलगी बळी पडली आहे असे नव्हे, तर अन्य काही निष्पाप, अजाणत्या मुलीही त्याच्या वासनेच्या शिकार बनल्या असल्याचे बोलले जात आहे. या शाळेचे ट्रस्टी एका मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. ठाकरे शिवसेनेच्या जयेश वाणी यांनी हा संपूर्ण अंगावर काटा आणणारा प्रकार उघड केला आहे. 


संतापजनक बाब म्हणजे आरोपी हा हिस्टरी शीटर असल्याची माहिती संबंधित संस्थेच्या चालकांना होती. तरीही केवळ एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून त्याला संस्थेत घेतल्याचे आरोप होतो आहे. राम पातकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याने अध्यक्ष पद भूषवलेली ही संस्था असूनही संस्थेत झाले सीसीटीव्ही काम करीत नाहीत. सदर घटना घडल्यानंतर तक्रार मिळूनही शाळेने मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे. 

दरम्यान ही बातमी बदलापूर मध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि लोक रस्त्यावर उतरले. काही नाही शाळेवर चाल करून शाळेतील वस्तूंची मोडतोड केली, तर संबंधित आरोपीला इथेच फाशीची शिक्षा मिळावी म्हणून लोक बदलापूर रेल्वे स्टेशन वरील रुळावर ठाण मांडून बसलेले आहेत. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून, संबंध मुलीचे पालक पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तातडीने दखल घेतली नाही, त्यांना तब्बल 12 तास रगडत ठेवण्यात आले आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. पोलीस प्रशासनाने दिरंगाई करणाऱ्या या पोलिसांवर कारवाई केली आहे तसेच शाळेने या प्रकरणातील संबंधितांना निलंबित केलं आहे. मात्र निलंबन नको, फाशीच हवी अशी मागणी आंदोलन करीत आहेत. 

दरम्यान राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अध्यक्षा प्रियांका कानूनगो पाठवणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात पॉक्सो कलम 19 खाली एफ आय आर दाखल केला जाणार आहे.