Sangli Samachar

The Janshakti News

चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल रखडलेल्या कामाविरोधात चाबूकफोड आंदोलन - नितीन शिंदे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ ऑगस्ट २०२४
रेल्वे प्रशासन व ठेकेदारामार्फत चिंतामणीनगर उड्डाणपूल बांधकामाचे तारीख पे तारीख मुदतवाढ सुरू आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या दक्षिण उत्तर परिसरासह माधवनगरपासून आटपाडी-विट्यापर्यंत तिच्या व्यापारी व नागरिकांबरोबर वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे 30 ऑगस्ट रोजी चिंतामणीनगर उड्डाण पुलापासून सांगली रेल्वे स्टेशनपर्यंत चाबूकफोड मोर्चा काढण्यात येईल, आणि सांगली रेल्वे प्रशासनाला हातात हंटर घेऊन जाब विचारण्यात येईल, असे प्रतिपादन माजी आमदार व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले की, या रखडलेल्या उड्डाणपुलामुळे नागरिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी त्यांच्या दुकानावर 'विकणे आहे'चा बोर्ड लावलेला आहे. या अपूर्ण कामाचा लहान मुले, महिला, व्यापारी, प्रवासी अशा सर्वांनाच त्रास होतो आहे. असे सांगून नितीन शिंदे म्हणाले की, एकदा नव्हे तर तीन वेळेला ठेकेदाराला मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ देण्याचा अधिकार कोणाला आहे ? आणि मुदतवाढ दिल्यानंतरही त्या ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही, तर याला जबाबदार कोण, त्याच्यावर काय कारवाई करणार असा सवालही यावेळी नितीन शिंदे यांनी केला. 


संगनमताने ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. असा आरोप करून नितीन शिंदे म्हणाले की, ही संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाचे आहे. व्यापाऱ्यांच्या झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या नुकसान भरपाईस जबाबदार कोण ? हे नुकसान भरपाई कोण भरून देणार ? आता 31 सप्टेंबर ची मुदत देण्यात आली आहे, तर या मुदतीत तरी रेल्वे पुलाचे रखडलेले काम पूर्ण होणार का ? आणि पूर्ण नाही झाले तर याला जबाबदार कोण असा सवालही नितीन शिंदे यांनी यावेळी केला.