Sangli Samachar

The Janshakti News

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांचे खा. विशाल पाटील यांना खुले आव्हान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ ऑगस्ट २०२४
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा रोवलेल्या खा. विशाल पाटील यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित करीत, ज्या विशाल पाटील यांचे विमान दिल्लीत लँड केले, त्या डॉ. विश्वजीत कदम यांनाच अडचणीत अनन्याचा डाव तरी खेळत नाहीत ना ? असा स्वभाव केला आहे. आटपाडी येथे खा. विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत, संजय विभुते यांनी थेट खा. विशाल पाटील यांची डॉ. विश्वजीत कदम यांच्या बाबतीतील मनोभूमिकेबाबतच शंका व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसात खा. विशाल पाटील यांचे जाहीर भाषणे पाहिली तर त्या कार्यक्रमात डॉ. विश्वजीत कदम यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला आहे. ज्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात. कारण महायुती व महाआघाडीतील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या राजकारण्यांना डॉ. विश्वजीत कदम हे अडसर ठरू शकतात, अशी शंका उपस्थित होईल, अशीच खा. विशाल पाटील यांची चाल असल्याची टीका संजय विभुते यांनी केली आहे.


लोकसभा निवडणुकीत आणि तदनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. विशाल पाटील हे पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. परिणामी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी, खा. विशाल पाटील यांना महाआघाडी बाबतची भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे. 

विशाल पाटील हे अपक्ष म्हणून खासदार झाले असले तरी, महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे त्यांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. अजूनही ते काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अशावेळी विशाल पाटील यांनी, ज्या खानापूर आटपाडीत ठाकरे शिवसेना गट विधानसभा निवडणूक लढवू इच्छिते, तिथे शिंदे गटाच्या नेत्याला महाआघाडीत घेऊ पाहत आहेत. हे महाआघाडीची प्रतारणा नाही का ? असा सवाल संजय विभूते यांनी केला आहे.

त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत 'मशाल विरुद्ध विशाल' असा सामना विधानसभा निवडणुकीतही होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आणि दोन्ही नेत्यांची हीच भूमिका महाआघाडीच्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारी ठरू शकतात, त्यामुळे वरिष्ठांनी याबाबत लक्ष घालावे. अशी मागणे महाआघाडीतील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.