Sangli Samachar

The Janshakti News

सांगली अर्बन बँकेची 88 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ ऑगस्ट २०२४
सांगली अर्बन बँकेची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २३ ऑगस्ट रोजी भावे नाट्यमंदिर येथे उत्सहात संपन्न झाली. बँकेने संचित तोटा भरुन काढून बँकेला निव्वळ नफा ६ कोटी ८२ लाख झाला आहे. पुढील वर्षीपासून सभासदांना किमान १० टक्के इतका लाभांश देण्याची ग्वाही बँकेचे अध्यक्ष श्री. गाडगीळ यांनी दिली. ठेवी, कर्ज, गुंतवणूक, वसुली अंतर्गत कामकाज या चौफेर प्रगतीमुळे बँकेस अ वर्ग मिळाला असल्याची गाडगीळ यांनी जाहिर केले.

यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ म्हणाले, यावर्षी सांगली अर्बन बँकेने मागील वर्षाअखेरचा पूर्ण संचित तोटा १७ कोटी ४२ लाख इतका भरुन काढून ३१ मार्च २०२४ अखेर ६ कोटी ८२ लाख इतका निव्वळ नफा मिळवला आहे. यावर्षी बँकेने आतापर्यतच्या इतिहासातील उल्लेखनिय कामगिरी केली आहे. बँकेचे नेट एन.पी.एचे प्रमाण कमी होऊन १.७८ टक्के पर्यंत खाली आहे, बँकेकडे सध्या ११८१ कोटींच्या ठेवी आहेत. ठेवीमध्ये ७५ कोटी ८४ लाख व कर्जामध्ये ४४ कोटी ७ लाखाची वाढ झाली आहे. गणेश गाडगीळ म्हणाले, मार्च २०२४ अखेर बँकेच्या ११८१ कोटी १९ लाख इतक्या झाल्या आहेत. कर्जे ६९४ कोटी ५४ लाख इतकी दिली आहेत. बँकेची गुंतवणूक ४९१ कोटीची झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १८७६ कोटी झाला आहे. बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण मागील वर्षाच्या २.९४ टक्केवरुन १.१६ टक्केनी कमी होऊन १.७८ टक्के झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार यावर्षी नेट एनपीए चे प्रमाण ३ टक्केच्या आत आहे, पुढीलवर्षी बँकेने शून्य टक्के एनपीए करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. बँकेने सभासदांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आय.एफ. एस.सी कोड, भांडवली खर्च, नवीन शाखा, डाटा सेंटर यासह अनेक गोष्टी सक्षम करणार आहे, असे गाडगीळ यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.


सुरुवातीला बँकेचे अध्यक्ष गाडगीळ, उपाध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नाईक यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयाचे वाचन केले. यावेळी श्रीकृष्ण माळी, जगदीश कालगावकर, हरिदास पाटील, एस. एल. पाटील यांनी कामकाजात सहभाग घेतला. यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला श्री गणेश गाडगे यांनी विस्तृतपणे उत्तरे दिली.

यावेळी संचालक अनंत मानवी, डॉ. अरविंद आरळी, हनुमंत पाटील, संजय पाटील, शैलेंद्र तेलंग, संजय धामणगावकर, रणजीत चव्हाण, कालिदास हरिदास, सागर घोंगडे, सतीश मालू, विश्वास चित्रे, सौ. स्वाती करंदीकर, सौ अश्विनी आठवले, रवींद्र भाकरे, मनोज कोरडे, सीए सागर फडके आदी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सर व्यवस्थापक वासुदेव दिवेकर, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, ऑरेनेटिक्स कंपनीचे तज्ञ संचालक दीपकबाबा शिंदे, प्रा रजपूत, डी. एस. जोशी, श्रीरंग मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी केले.