Sangli Samachar

The Janshakti News

प्राणघातक हल्ल्यात जखमी तरुणीला मदत करणाऱ्या अमित मुळकेंचा पृथ्वीराज पाटील यांच्याकडून सत्कार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑगस्ट २०२४
मागील आठवड्यात सांगली कॉलेज कॉर्नर जवळ घरगुती वादातून तरुणीवर तिच्या पतीने हल्ला केला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती, परंतु मदतीसाठी कोणीच पुढे येत नव्हते. तेव्हा अत्यंत धाडसाने तेथे उपस्थित असलेल्या अमित मुळके या रिक्षा चालकाने सदर तरुणीस रिक्षातून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले. यामुळे सदर तरुणीचा वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचला होता. या धाडसी कारवाईचे दखल घेऊन पृथ्वीराजबाबा पाटील यांनी शाल बुके व रोग पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन पाठ थोपटली. 

यावेळी बोलताना पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, अमित मुळके याचा आदर्श समाजाने, विशेषतः तरुणांनी घ्यायला हवा. समाजात ज्या ज्या वेळी समाजविघात गोष्टी घडतात विशेष करून महिलांवर व तरुणीवर अशा प्रकारे माथेफिरुकडून जीवघेणा हल्ला होतो, तेव्हा तेथे उपस्थित असलेले लोक केवळ बघ्याची भूमिका घेतात. परंतु धाडसाने पुढे येऊन या प्रकारात हस्तक्षेप केला तर अनेक महिला तरुणीचे जीव वाचू शकतात, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराजबाबा पाटील यांनी व्यक्त केली.

सत्कारप्रसंगी बोलताना पृथ्वीराजबाबा पाटील पुढे म्हणाले की कॉलेज कॉर्नर येथे प्राण घातक हल्ला केलेल्या मुलीला रिक्षा मधून स्वतः अमित मूळपे यांनी शिबिर हॉस्पिटल येथे दाखल केले. या धाडसी कृत्यानेच तरुणीचा जीव वाचला आहे. याची दखल घेऊन आपण अमित मोळके याचा सन्मान करीत आहोत.