Sangli Samachar

The Janshakti News

ग्रामीण विकास निधीमधून सांगली मतदार संघात सहा कोटींची विकास कामे मंजूर - आ. सुधीरदादा


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑगस्ट २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावांसाठी आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या मागणीनुसार सहा कोटी रुपये खर्चाचक कामे मंजूर करण्यात आली आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने या संदर्भात एक अध्यादेश जारी केला असून मतदारसंघातील हरिपूर, बुधगाव, बिसूर, पद्माळे, नांद्रे, वाजेगाव, कावची खोतवाडी, कर्नाळ, इनाम धामणी आणि अंकली या गावांमध्ये या निधीतून आवश्यकतेनुसार कमी केली जाणार आहेत. याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे.

आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी जगातील ग्रामीण भागामध्ये नागरी सुविधांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्रालयाने 25-15 योजनेअंतर्गत विविध विकास कामे मंजूर केली आहेत. यासाठी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात नागरिक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्यामुळे वरील गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान आ. सुधीर दादा गाडगीळ यांनी गेल्या पाच वर्षात शासनाच्या विविध योजनांमधून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून, या निधीतून सांगली विधानसभा मतदारसंघात विकास कामाचा डोंगर उभा केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांतूनच सुधीरदादांना 'कार्यसम्राट' बहाल करण्यात आली आहे. स्वच्छ प्रतिमा, सर्वसामान्यांबद्दल आदर, विशेषतः बद्दल आपुलकी यामुळेच आ. सुधीरदादा यांची 'आपला माणूस' ही प्रतिमा निर्माण झाली आहे.