Sangli Samachar

The Janshakti News

महापालिकेत सद्भावना दिवस संपन्न, अधिकाऱ्यांनी घेतली सदभावणीची शपथ !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० ऑगस्ट २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त तथा प्रशासक आणि उपायुक्त (मुख्यालय), वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सद्भावना दिवस संपन्न झाला.


यावेळी रघुवीर हलवाई यांनी प्रतिज्ञा वाचन केले. याप्रसंगी डॉ. रवींद्र ताटे, सहा. आयुक्त मालमत्ता अशोक मानकापुरे, धनंजय हर्षद, विशेष कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा विभाग सुनील पाटील तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.