Sangli Samachar

The Janshakti News

गणेशोत्सवसाठी महापालिका सज्ज, प्रभाग समितीनिहाय 'एक खिडकी योजना' !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० ऑगस्ट २०२४
महानगरपालिका क्षेत्रात गणेशोत्सव उत्तम प्रकारे साजरा करण्यासाठी, महापालिकेच्यावतीने आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ उपआयुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होते.

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवामध्ये श्री गणेश मूर्तींचे आगमन होणारे सर्व मार्ग चांगले असले पाहिजेत, यासाठी रस्त्यावरील खडे बुजवून घेण्यात येणार आहेत, कोणतीही अडचण निर्माण होणार नाही ,याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्या मार्गावरील स्वच्छता देखील चागल्या प्रकारे ठेवण्यात येणार आहे, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. डॉ. रवींद्र ताटे यांनी स्वच्छतेसाठी कर्मचारी अधिकारी यांची नियुक्त केली असून त्याबाबत माहिती दिली.


 विसर्जन व्यवस्थैवर सुव्यवस्थित नियोजनाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त आणि उप आयुक्त वरिष्ठ स्तरावर देण्यात आली आहे, त्याचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे.

सदर उपाययोजना प्रत्येक गोष्टीचे मायक्रो प्लॅनिंग तयार करण्यात येऊन मान्यता देखील देण्यात येत आहे. गणेशोत्सव नंतर कोणतेही फाईल मंजुरी देण्यात येणार नाही, या बाबत स्पष्टपणे आदेश दिले आहेत.

सर्व सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या विभागात एक खिडकी योजना सुरु करण्याबाबत यावेळी सूचना दिल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव काळात देण्यात येणाऱ्या परवानग्या देण्यास सुरु करण्या बाबत आदेश दिले आहेत.

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशा विरुद्ध मंडप / स्टेज परवाना दिला जाणार नाही, तसेच मंडप / स्टेज परवाना देताना, अग्निशामक व रुग्णवाहिका वाहतुकीस अडथळा होणार नाही याची, व मा. न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन होणार नाही दक्षता घेऊन गणेशोत्सव मंडळांना मंडप व स्टेज परवाना देताना शासन निर्देशाप्रमाणे योग्य उंचीच्या मूर्तीची स्थापना केली जाईल, याबाबत त्यामंडळाचे लेखी पत्र घेण्यासाठी विनंती करावी असे यावेळी सूचित केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ संदर्भातील महाराष्ट्र शासन गृहविभाग यांच्या परिपत्रकामधील मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल, याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याबाबत माहिती संबंधितांना देण्यात यावी,
दरवर्षी ज्याठिकाणी गणपती स्टॉलला परवानगी देण्यात येते, त्या ठिकाणच्या स्टॉलला परवानगी देताना, स्वच्छता उपभोक्ता शुल्क भरून घेणे आवश्यक आहे, अशी सूचना देण्यात आली आहे.

प्रत्येक पोस्टर, बॅनर, फ्लेक्सवर संबंधित प्राधिकारी यांचेकडील परवानगीचा क्रमांक, दिनांक व प्रदर्शित कालावधी नमूद करणेत आवश्यक आहे. 

मागील वर्षापेक्षा अधिक गणपती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंडांची ठिकाणे व मूर्तीदान निश्चित करण्यात येत आहे. मागील वर्षी मूर्तीदानाला मिळालेला प्रतिसाद पाहता, यावर्षी अधिकचे मूर्तीदान केंद्र देखील निश्चित करण्यात आले आहे.

कृत्रिम विसर्जन कुंडाचा आढावा घेऊन, जादाचे विसर्जन कुंडांची आवश्यकता असल्यास त्याबाबतची तयारी पूर्ण करण्याची आहे अशी सूचना दिल्या आहेत, ज्याठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड व मूर्तीदान केंद्र निश्चित केले आहे. मंडप घालणे व इ. आवश्यक तयारी करण्यात येत आहे.

नागरिकांचे माहितीसाठी विसर्जनाचे ठिकाणे, कृत्रिम विसर्जन कुंडाची ठिकाणे व मूर्तीदान ठिकाणे नागरिकांच्या माहितीसाठी सोशल मिडीयावर प्रसिद्ध वेळोवेळी करण्यात येणार आहे. या वेळी सहा. आयुक्त, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.