Sangli Samachar

The Janshakti News

पॅन कार्ड वरील नंबरच्या मागील रंजक कहाणी, कोणत्या नंबरचा अर्थ काय ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ ऑगस्ट २०२४
बँक व्यवहार तसेच छोट्या-मोठ्या प्रत्येक व्यवसायासाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आली आहे. मध्यंतरी पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक असल्याशिवाय बँकेतील व्यावसायिकांचे व्यवहार होणे केवळ अशक्य आणि म्हणूनच या पॅन कार्डची आवश्यकता प्रत्येक व्यावसायिकाला असतेच. हे पॅन कार्ड 'व्यावसायिकांचे ओळख' म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या प्रत्येकानेच या पॅन कार्ड वरील नंबर पाहिला असेल. अनेक ठिकाणी व्यवहारात हा पॅन नंबर महत्त्वाचा असतो. पॅन कार्ड वरील नंबर दहा अंकी असून प्रत्येक करदात्याचा पॅन क्रमांक वेगळा असतो. काही इंग्रजी अक्षरेही असतात. हे पॅन नंबर आणि अक्षरांचा अर्थ काय ? आपल्यापैकी किती जणांना या पॅन कार्ड वरील क्रमांकाची व अक्षरांची माहिती असते ? याच बद्दलची ही रंजक माहिती....

पॅन कार्डवर असलेल्या 10 अंकी नंबरला पॅन कार्ड नंबर म्हणतात. पॅन नंबरमध्ये पहिले 5 वर्ण असतात, जे कॅपिटल फॉर्ममध्ये (अपरकेस) एंटर केले जातात. या 5 अक्षरांपैकी पहिली 3 अक्षरे AAA ते ZZZ या मालिकेतील अक्षरे आहेत. या अक्षरांनंतर उपस्थित असलेले चौथे अक्षर पॅनकार्ड धारकाची स्थिती सांगते. उदाहरणार्थ, C म्हणजे कंपनी, P म्हणजे व्यक्ती, H म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब, F म्हणजे फर्म, A म्हणजे लोकांची संघटना आणि T म्हणजे ट्रस्ट..


काहीजणांना शंका असते की आपण पॅन कार्ड बदलू शकतो का ? ? तर नाही... एकदा पॅन कार्ड काढले की ते आपण बदलू शकत नाही. त्यावरील नंबर हीच करदात्याची ओळख असते ती वारंवार बदलता येत नाही मात्र आपले नाव, जन्मतारीख, पत्ता ही माहिती आपण बदलू शकतो. अर्थात ती चुकली असेल तरच... आणि यासाठी ही एनएसडीएल किंवा आयकर वेबसाईटवरून पीडीएफ फॉरमॅटमधील पॅन कार्ड दुरुस्ती फॉर्म भरावा लागेल. आपणास सहजपणे इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेता येऊ शकतो. हा फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरावा लागतो, जेणेकरून नवीन पॅन कार्ड चुकीचे तयार झाले, तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.