Sangli Samachar

The Janshakti News

महापालिकेचे अर्थिक दायित्व केले जात आहे कमी करण्याचा प्रयत्न आयुक्त शुभम गुप्ता


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑगस्ट २०२४
जनरल फंड व शासकीय फंड या मधून केलेली विकास कामे त्याची महापालिकेचे आर्थिक दायित्व याबाबत महत्वाचे निर्णय मा शुभम गुप्ता आयुक्त म्हणून स्वीकारल्यानंतर घेतले आहेत.

जनरल फंड मधून झालेल्या कामाची देयके साधरणपणे ४२कोटी ५८ लाख नवीन ४ कोटी अशी ४७ कोटी इतकी देयके थकबाकी स्वरूपात होती, १८ कोटी इतकी देयके अदा केल्याने ४७ कोटी वरून २९कोटी इतके दायित्व राहिले आहे. त्या बरोबर शासकीय निधी म्हणजे स्पेशेल प्रोजेक्टमधून अमृत योजनेसाठी ४.५ कोटी एल इ डी साठी २.५ अदा. कोर प्रोजेक्ट करीता 2 कोटी रक्कम अदा करण्यात आली आहे .


DPDC तसेच मूलभूत सोयी सुविधा योजना मनपा हिस्सा वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी देयके अदा झाल्यामुळे 2 वर्षे प्रलंबित असणारी देयके सुद्धा अदा करण्यात आली आहेत. साधारणपणे पूर्वीचे ३१.०५कोटी नवीन ३.५ कोटी अशी ३५ कोटी दायित्व कमी करण्यासाठी १८.३३ कोटीची देयके अदा केल्याने १६.६७ कोटी इतके दायित्व शिल्लक राहिले आहे.
 
आवश्यक ती विकास कामे आणि त्या वरील खर्च यावर नियंत्रण ठेऊन सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयन्त करण्याचे नियोजन येणाऱ्या काळात मा शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. सर्व खाते प्रमुख आणि अकाउंट विभाग लेखापरीक्षण विभाग यांच्या समन्वयातून महत्वाचे विकास कामावर आवश्यक खर्च झालाच पाहिजे त्याचबरोबर प्राप्त निविदा मधून काटकसर करणे ते देखील निवेदन समिती मार्फत पाहिले जात आहे, महापालिकेचे आर्थिक हित जपण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहे.