Sangli Samachar

The Janshakti News

वरळी 'हिट अँड रनचा थरार', राजकारणातलं बडे प्रस्थ, पण पंधरा मिनिटात खेळ खल्लास !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० जुलै २०२४
मुंबईचं पोलीस खातं जगात अव्वल क्रमांकावर आहे. अनेक किचकट गुन्ह्यांमध्ये पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीमुळे जगभरात कौतुक होते. अर्थात 'उडदामाजी काळे गोरे' या म्हणीचे प्रत्यंतर हे अधून मधून मुंबईकरांना येत असते हा भाग अलहिदा...

पण नुकत्याच वरळी हिट अँड रन प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यामधील गुन्हेगार थेट मुख्यमंत्र्यांचे पालघर मधील शिवसेना उपनेते राजेश शहा यांचा दिवटा. त्यांनीच एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आपल्या दिवट्या चिरंजीवास पळून जाण्यास मदत केल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून गुन्हेगार कितीही मोठा असला तरी हयगय करू नका असे आदेश दिले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांचे बळ वाढले. आणि 60 दिवस गुंगारा देणाऱ्या मिहिर शहाच्या मुस्क्या आवळल्या. पण त्यांनी कशी केली ही कामगिरी हे पाहणे हे मोठे कौतुकास्पद आहे.


मंगळवारी सकाळी मिहीरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला होता. अवघ्या 15 मिनिटांत पुन्हा फोन बंद करण्यात आला. पण, हा फोन पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता, त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं. आरोपी मिहीर शाह हा त्याचे मित्र शहापूरला रिसोर्टमध्ये होते. मित्र आणि त्याने स्वत: मोबाइल बंद ठेवल्यामुळे पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मिहीर हा त्याचा पालघर आणि बोरिवलीच्या एका मित्राच्या दुसऱ्या फोनवरून अनेकांशी संवाद साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल रात्री दोन मित्रांसह मिहीर हा कुटुंबियांना न कळवता. विरारला आला. दरम्यान, आज सकाळी 15 मिनिटांसाठी मिहीरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला अन एका महिलेच्या जीवाशी खेळणाऱ्या मिहिरचा खेळ खल्लास झाला.