Sangli Samachar

The Janshakti News

प्रतिस्पर्धी खेळाडूंना गुडघे टेकायला लावणाऱ्या सनथला, भारतीय आयुर्वेदाने दिली उभे राहण्याची ताकद !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० जुलै २०२४
सनथ जयसूर्या... श्रीलंकेचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू, ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचे अक्षरशः पिसे काढली. फलंदाज म्हणून तो क्रिजवर आला आणि त्याचा जम बसला की, शतक किंवा अर्धशतक केल्याशिवाय तो पॅवेलियनमध्ये परतायचाच नाही. आणि गोलंदाज म्हणून उभा राहिला की, प्रतिस्पर्धी संघाच्या धावांचे गती मंदायची. भल्या भल्या फलंदाज आणि गोलंदाजांना घाम फोडायचा.

परंतु प्रतिस्पर्धी संघाला गुडघे टेकायला लावणाऱ्या जयसुर्याला स्वतःच्या पायावर उभे राहणे मुश्किल झाले होते. 2018 मधील ही घटना. फलंदाजी किंवा गोलंदाजी सोडाच पण उभे राहण्यासाठी आणि चालण्यासाठी त्याला आधाराची गरज लागायची. आणि गंमत म्हणजे ज्या भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांना सनथ जयसूर्याने अक्षरशः पळताभुई केली होती, त्याच भारताच्या आयुर्वेदाने त्याच्या पायात ताकद निर्माण करून दिली.


सनथ जयसूर्याची ही अवस्था पाहिल्यानंतर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ने त्याला भारतीय आयुर्वेदाचे सहाय्य घेण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर शिंदवाडा येथील आयुर्वेदाचार्य डॉ. प्रकाश यांच्याशी भेट घडवून दिले पातालकोटच्या औषधालयात, औषधी वनस्पतीचे सनथ जयसूर्यावर उपचार सुरू झाले. हिमालयाप्रमाणेच हे दुर्मिळ वनौषवीचे माहेरघर मानले जाते. इथे सनद जयसूर्याला एक नवे आयुष्य प्राप्त झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

2010 मध्ये त्याने श्रीलंकेच्या संसदेत खासदार म्हणून कारकीर्द गाजवली होती. असा हा श्रीलंकेचा धडाकेबाज क्रिकेटपटू सध्या संघाचा अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य करतो आहे. कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत श्रीलंकन संघाने त्याला देशासाठी योगदान देण्याचे आवाहन केल्यानंतर, देशाभिमानी सनथ याने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. आयपीएल मध्येही सनथने आयपीएल मध्ये सनथची मुंबई इंडियन्स कडून खेळताना दमदार कामगिरी केली होती.