yuva MAharashtra उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल !

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ जून २०२४
आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले आहेत. दरम्यान 20 मे रोजी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. यामध्ये मुंबई आणि परिसरातील जागांचा समावेश होता. तेव्हा मतदान संथ गतीने होत आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावर, उद्धव ठाकरे यांनी आचार संहितेचा भंग केल्याचे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले. यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मुंबई आणि परिसरातील जांगांवर मतदान होते. त्यावेळी मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर संथ गतीने मतदान सुरू होते. त्यामुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त करत मतदान न करताच माघारी फिरणे पसंत केले होते. हा सर्व गोंधळ उडालेला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबरच ठाकरेंनी यांनी मतदारांनी कितीही उशीर झाला तरी मतदान करावे असे आवाहन केले होते.


यानंतर उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांनी आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरेंनी मतदानादिवशी मतदारांवर प्रभाव टाकल्याचा व आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने अशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल घेत संपूर्ण प्रकरणाचे तपशील मागवले होते. हे पुरावे तपासल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करायला सांगितले आहे.