yuva MAharashtra अ. भा. नाट्य परिषद सांगली शाखेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कुलदीप देवकुळे यांचा सत्कार !

अ. भा. नाट्य परिषद सांगली शाखेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कुलदीप देवकुळे यांचा सत्कार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जून २०२४
सांगली येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी कुलदीप देवकुळे यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली शाखेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राचार्य शिवश्री सतीश तराळ यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.  

प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे सांगली जिल्हा सचिव शिवश्री अमृत तात्या सूर्यवंशी व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री युवराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी शिवश्री आनंदराव उर्फ नंदकुमार जाधव, जयश्री पाटील, सुप्रिया मगदूम, सुमेधा दिवाण, शांता वडेर, निर्मला लोंढे, ऋजुता माने, त्रिशला शहा, आशा धनाल, डॉ. स्वाती पाटील, मनीषा रायजादे, मनीषा हरोलीकर, नीला ताम्हणकर, गजानन पाटील, तानाजीराजे जाधव, कुमुदिन मधाळे, आरती लाटणे, सुधा *पाटील, हरिभाऊ यादव, निर्मलादेवी किरणराव आळणे, स्मिता दोशी, आनंदहरी, मेहबूब जमादार, स्वानंद कुलकर्णी, रेखा हिरेमठ, संभाजी माने, प्रकाश वायदंडे, सचिन कुसनाळे,, अमर गायकवाड-कोडोली, सहदेव माळी-जत, प्रतिभा जगदाळे, वनिता जांगळे, सुनिता पाटी अस्मिता इनामदार, विजय शेणवी मांगरूळ, नरहरी निकाडे, भगवान पाटील, दिपक पवार, संतोष काळे, सिराज शिकलगार, मुबारक उमराणी, रामचंद्र कांबळे पट्टनकोडोली, आणि पत्रकार विनायक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.