| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जून २०२४
शांतता सुव्यवस्था राहिल्यास समाजाचा विकास होणार आहे. संविधानिक अधिकार तसेच कायद्याविषयी सन्मान व जाणीव जागृती झाल्यास नागरिकांचे शोषण होणार नाही. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकसहभाग व लोक पुढाकाराने 10 जुलै 2024 पासून घोषवाक्य जन जागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय विविध सामाजिक संस्था, संघटना, सतर्क नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बैठकीच्या अध्यक्षस्थानी पै. प्रदीप (चंदू )पाटील (कवठेपिरान) होते. यावेळी शहराच्या मध्यवर्ती चौकात, 10 जुलै मातृ सुरक्षा दिना पासून, जनजागृती अभियानाच्या माध्यमातून प्रबोधनपर मानवी घोषवाक्य पोस्टर साखळी करण्यात येणार आहे.
पोस्टरवर पुढील घोषवाक्यांचा समावेश असेल. सभी धर्मोका एक ही नारा, प्यार मोहब्बत भाईचारा ! ईश्वर, अल्ला, वाहेगुरू चाहे कहो श्रीराम ! सबका मालिक एक है, अलग अलग है नाम ! माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म ! लाच न घेता नागरिकांचे कामे करणारे प्रामाणिक अधिकारी, देशाचा उद्धारकरी ! सर्व धर्मियांशी प्रेमळ संगत, आणेल आपल्या जीवनात रंगत! घरात आणि कामाच्या ठिकाणी महिलांशी बरोबरीच्या भावनेने वागणारे पुरुष ! आपल्या जगण्यातून पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल अशी काळजी घेणारे नागरिक, आम्ही भारतीय नागरिक! भोंदूगिरीच्या आहारी न जाता प्रयत्न वादातून आणि मित्र नातलगांच्या मदतीने जीवनातील संकटांना भिडणारे नागरिक बनूया. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे या भावनेने नुकसान न करणारे नागरिक, खरे राष्ट्रप्रेमी नागरिक !
सदर अभियान यशस्वी करण्याकरिता विविध नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये ॲड. त्रिशला पाटील, अनमोल पाटील, तुषार वळीव, प्रमोद माळी, इलियास शेख, निशाताई बचुटे, अल्ताफ खतीब, विनायक ओलेकर, निलेश मोहिते, यासीन मुल्ला, शबाना शेख, विजय चांदणे, विशाल सौंदडे, योगेश जाधव, रमजान खलिफा, महंमद खाटीक, अनिल इरकर, बालम मुजावर, सारिका कुलकर्णी इत्यादींचा समावेश आहे. तरी शांतता प्रेमी, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी कर्तव्य भावनेने अभियानात सहभागी व्हावे! असे आवाहन समारोप प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख यांनी केले.