yuva MAharashtra आज रिक्षा-टॅक्सी-व्हॅन परवानाधारक कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा !

आज रिक्षा-टॅक्सी-व्हॅन परवानाधारक कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जून २०२४
केंद्र सरकारच्या २९ डिसेंबर २०१६ च्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील रिक्षा, टॅक्सी व व्हॅन आणि इतर परवानाधारक वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन रु.५०विलंब शुल्क आकारला जात आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. २०१९ व २०२१ चा महापूर आणि कोरोना काळात फार मोठे नुकसान सोसावे लागले होते. अशा आर्थिक अडचणीच्या काळात वाहनावरील बँकांचे कर्ज हफ्ते व्याजाची रक्कम भरणे मुश्किल झाले. शिवाय रिक्षांना मुक्त परवाना वाटप धोरणामुळे रिक्षा व्यवसाय अखेरची घटका मोजत आहे. यामुळे सर्वसामान्य रिक्षा, टॅक्सी व व्हॅन चालक वैतागून गेले आहेत. अशा कठीण काळात पुन्हा शासनाने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रतिदिन रु. ५० विलंब शुल्क आकारणे म्हणजे जखमेवर मीठ चोळले आहे. 


हा विलंब शुल्क भरणे शक्यच नाही. तो रद्द व्हावा यासाठी सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी व वाहन चालक परवाना कृती समितीच्या वतीने दि. २४ जून २०२४ रोजी सांगलीत विश्रामबाग चौक ते कलेक्टर कार्यालयावर रिक्षा टॅक्सी व वाहन चालकांचा धडक मोर्चा स. 10.30 वा आयोजित केला आहे. जर विलंब शुल्क माफ झाला नाही तर आणखी काही संघटनानां बरोबर घेऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. या धडक मोर्चात सर्व रिक्षा टॅक्सी व वाहन चालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे.