yuva MAharashtra बार्टी (पुणे) यांच्या अनिवासी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - उत्तमराव कांबळे.

बार्टी (पुणे) यांच्या अनिवासी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - उत्तमराव कांबळे.


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जून २०२४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सांगली येथे बार्टी पुणे मार्फत अनुसूचित जाती मधील युवक युवती यांच्यासाठी अनिवासी निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याविषयी मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व राहुल दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सामाजिक न्याय विभाग, सांगली जिल्हा अध्यक्ष मा.उत्तमराव आबा कांबळे यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी मार्गदर्शन करताना उत्तमराव कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सांगली येथे बार्टी पुणे मार्फत अनुसूचित जाती मधील युवक युवती यांच्यासाठी अनिवासी निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा समाजातील तरुण, तरुणींनी अधिकाधिक लाभ घ्यावा. हे प्रशिक्षण सर्वांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे, म्हणून अधिकाधिक तरुण-तरुणींनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले

यावेळी बार्टी च्या राऊत मॅडम, किरणराज कांबळे, हर्षद कांबळे, प्रा. सरला कांबळे, शुभांगी कांबळे, उदय कांबळे, राजेश अरवाळे, अभिजीत रांजणे, सुनील कांबळे, आकाश कांबळे, आदी सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.