Sangli Samachar

The Janshakti News

पुण्यातील भिकाऱ्यांचा डॉक्टर : डॉक्टर सोनवणे !



सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २४ जून २०२४
डॉ अभिजीत सोनवणे, पुण्यामध्ये, भीक मागणाऱ्या आजी आजोबा आणि त्यांच्या मुला, मुली, नातवंडे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करणारा गरिबांचा डॉक्टर...

सुरुवातीच्या पडझडीच्या काळात डॉ. सोनवणे यांना आयुष्यात एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती.... त्यानंतर एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये डॉ. सोनवणे महाराष्ट्र प्रमुख म्हणून नोकरीस लागले. तिथे दरमहा 5 लाख इतके उत्पन्न होते ...

भीक मागणाऱ्या या आजोबांनी डॉ. सोनवणे यांना गरजेच्या त्यावेळी जर मदत केली नसती, तर आज ते इथवर पोहोचूच शकले नसते... आणि म्हणून, 15 ऑगस्ट 2015 रोजी, आंतरराष्ट्रीय संस्थेतील नोकरी सोडून, त्यांना मदत करणाऱ्या त्या भीक मागणाऱ्या आजोबांचे ऋण मानून..... रस्त्यावर भीक मागणाऱ्या... निराधार लोकांसाठी... हे काम सुरू केले आहे...

मोटरसायकल वरून संपूर्ण दवाखाना बरोबर घेऊन पुण्यामध्ये लोक जिथे भीक मागतात त्यांच्यामध्येच रस्त्यावरच बसून डॉ. त्यांना वैद्यकीय सेवा देतात. त्यांच्याबरोबरच बसतात. जेवतात. खातत....(जेवतात, खातात म्हणजे घरून जेवणाचा डबा नेत नाहीत, तर भीक मागणाऱ्या लोकांना भिकेमध्ये जे काही मिळेल तेच खातात.) हेतू हा की, हे सर्व करताना भिक मागणाऱ्या लोकांशी एक चांगले नाते तयार करून त्यांना भीक मागणे सोडण्याविषयी विनंती करता यावी आणि जे लोक तयार होतील अशा लोकांना मग व्यवसाय टाकून देता यावा, या माध्यमातून त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करता यावा म्हणून.

कामाचं नेमकं स्वरूप कळण्यासाठी.... डोळ्यांसमोर ते येण्यासाठी .... ही डॉक्युमेंटरी....!

डॉ. सोनवणे भिक मागणाऱ्या रस्त्यावरील मुलांना दत्तक घेऊन शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देत आहोत. फुटपाथ वर पडलेल्या निराधार लोकांना लोकांची दाढी कटिंग करून रस्त्यावर त्यांना आंघोळ घालतात. आणि त्यांची एखाद्या सुरक्षित स्थळी सोय करतात.

"सांगण्यासारखं आणखी खूप आहे... हे सर्व जे काही सुरू आहे ते समाजाच्या मदतीने सुरू आहे. यात मी विशेष काही करतो आहे." असं डॉ. सोनवणे म्हणतात.... डॉक्टर म्हणून... माणूस म्हणून... माझं हे कर्तव्य आहे.... ! मी करत असलेलं काम म्हणजे मला मदत केलेल्या... भिक मागणाऱ्या त्या आजोबांना, मी वाहिलेली श्रद्धांजली आहे !" असं अत्यंत भावपूर्ण शब्दात ते आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

या सर्व कामात त्यांची पत्नी डॉ सौ मनीषा सोनवणे यांचा सक्रिय सहभाग असतो. जे काही करतो, ते भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतात, आणि म्हणून लोक त्यांना 'भिकाऱ्यांचा डॉक्टर' किंवा 'डॉक्टर फॉर बेगर्स' असं म्हणतात आणि या पदवीचा डॉ. सोनवणे यांना सार्थ अभिमान आहे !

डॉ अभिजीत सोनवणे
"डॉक्टर फॉर बेगर्स"
सोहम ट्रस्ट पुणे
*9822267357
*sohamtrust2014@gmail.com