Sangli Samachar

The Janshakti News

शेतकरी मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर सरकारने पाच लाख रुपये जमा करावेत - राजू शेट्टी !


सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि. २४ जून २०२४
सध्या सर्वच समाजात विवाहाची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. विवाहोत्सुक तरुणींच्या अपेक्षा पाहिल्या की, 'आजीवन ब्रह्मचारी राहिलेले बरे !' असे वैतागोद्गार तरुणांकडून ऐकायला मिळत आहेत. मुलाला किमान चार ते पाच एकर शेती हवी, पुणे किंवा मुंबई येथे चार आकडी पगाराची नोकरी हवी, (शासकीय नोकरी असेल तर उत्तम), घरी सासरा, सासू, दीर, नणंद कुणी नको. स्वतःचा टू बीएचके फ्लॅट हवा, घरी वाहन हवे, (चार चाकी असल्यास उत्तम), अशा प्रकारच्या अनेक अपेक्षा मुलींकडून केल्या जात आहेत. शेतकरी मुलांना तर मुली शोधून त्याला फेस येण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक तरुण निराशेच्या छायेत आहेत. 'शेतकरी नवरा नको ग बाई !' असा ट्रेंड सध्या सर्वत्र दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी पुढे सरसावले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दोन दिवसीय मेळावा संपन्न झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी घेतलेल्या परिपत्रकार परिषदेत, शासनाने 35 वर्षापुढील मुलांशी ज्या मुली लग्न करण्यास तयार आहेत, त्यांच्या खात्यावर पाच लाख रुपये जमा करावेत अशी मागणी केली आहे. 


यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकरी मेळाव्यात केलेल्या 15 ठरावांची माहिती पत्रकारांना दिली. यामध्ये कर्जमुक्त करावे ही प्रमुख मागणी असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, जास्त पैसे घेणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई, महिला बचत गटांना कर्जमाफी, शेतमजुरांचा अपघात विमा योजनात समावेश, शैक्षणिक कर्जाची हमी सरकारने घ्यावी घ्यावी. अशा प्रमुख मागण्या आहेत.

या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.