| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जून २०२४
राज्य शासन व जनहित याचिका १५५/२०११ यामध्ये वेळोवेळी दिलेले आदेश तसेच नियमावली व मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर होल्डिंगवर कारवाई करून अहवाल सादर केले जात आहेत. सध्या महापालिका क्षेत्रामध्ये व्यापक सर्वे केला असता, 30 विनापरवाना होर्डिंग असल्याचे निदर्शनास आले. सदरचे बेकायदेशीर होर्डिंग ज्या दिवशी उभे केले आहेत, त्या दिवसापासून आजअखेर त्यांच्यावर दंड आकारणी करून, कारवाई करण्याचे नियोजन व तसा प्रशासकीय ठराव घेण्याची कारवाई सध्या सुरू आहे.
सर्वेक्षणामध्ये बेकायदेशीर ठरलेली होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची कारवाई केली असून, प्रभाग निहाय तपशील खालील प्रमाणे- प्रभाग समिती एक मध्ये 19, प्रभाग समिती दोन मध्ये 5, प्रभाग समिती तीन मध्ये एक तर प्रभाग समितीच्या मध्ये पाच असे एकूण 30 विना प्रमाणात होर्डिंग काढून टाकले आहेत.
यापुढे संपूर्ण महापालिका क्षेत्रासाठी एक नोडल अधिकारी व नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त वैभव साबळे तसेच प्रभाग निहाय सहाय्यक आयुक्त यांची कायमस्वरूपी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 25 जानेवारी 2024 रोजी राजपत्र मध्ये प्रसिद्धी देऊन संबंधित अधिकारी यांना विनापरवाना बेकायदेशीर होर्डिंग फलक जाहिराती व नियंत्रण ठेवण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. होर्डिंग जाहिरात फलक बोर्ड याबाबत सूचना अगर तक्रार दाखल करण्यासाठी 18002312374/75, या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त वैभव साबळे यांनी केले आहे.