Sangli Samachar

The Janshakti News

संसदेच्या पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ जून २०२४
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची शनिवारी लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्यांनी एकमुखाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत ठराव मंजूर केला.


वायनाड मतदार संघाचा राजीनामा

राहुल गांधी यांनी लाेकसभा निवडणूक केरळ मधील वायनाड तर उत्तर प्रदेश राज्‍यातील रायबरेली मतदारसंघातून लढवली हाेती. दाेन्‍ही मतदारसंघात त्‍यांना घवघवीत यश मिळाले. आता त्‍यांना एका मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा द्‍यावा लागणार आहे. त्‍यांनी वायनाड मतदारसंघातील जागेचा राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतला आहे. वायनाड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला मानला जाताे. राहुल गांधी यांनी वायनाड लाेकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्‍यानंतर येथे पाेटनिवडणूक हाेईल. काँग्रेस पक्षाच्‍या वतीने येथे काेणाला संधी मिळणार याकडेही राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.