Sangli Samachar

The Janshakti News

राज्यात ५० हजार पदांची शासकीय भरती आणि मुलींना मोफत उच्चशिक्षण देणार !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
राज्यात ५० हजार पदांची शासकीय भरती आणि २० लाख मुलींना मोफत उच्चशिक्षण देणार असल्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकार लवकरच घेणार आहे. राज्यात 50 हजार पदांवर शासकीय भरती करण्यात येणार आहे. राज्याच्या एकूण 43 शासकीय विभागांमध्ये अजूनही दीड लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आहे. सध्या 17,771 पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पण त्यांच्या भरतीचे वेळापत्रक अजूनही फायनल झालेले नाही. दुसरीकडे आरोग्य, शिक्षण, जिल्हा परिषदांसह अन्य विभागांमधील प्रलंबित भरती देखील आगामी तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.


मुलींसाठी मोठा निर्णय 

तसेच राज्यातील दरवर्षी जवळपास २० लाख मुली उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात. सध्या त्यांना शैक्षणिक शुल्कात काही प्रमाणात सवलत दिली जाते, परंतु आता सरकार मुलींसाठी शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचा विचार करत आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने यापूर्वीच सरसकट सर्व मुलींसाठी १००% शुल्कमाफी देऊन उच्चशिक्षण मोफत करण्याचा मसुदा मंजूर केला आहे. आता हा मसुदा मंत्रिमंडळापुढे सादर केला जाणार असून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.