Sangli Samachar

The Janshakti News

रात्री ड्युटीवर गेला, सकाळी मृतदेह आढळला; ३० वर्षीय युवकासोबत घडलं भयंकर !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जून २०२४
डोक्यात दगड घालून तीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरात घडली. शहरातील राजूनगर मंगळवार बाजार परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली शहरातील राजूनगर मंगळवार बाजार जवळील मज्जित समोर एका युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयुरेश यशवंत चव्हाण (वय, 30 रा. भेंडवडे. ता. हातकणंगले.जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये केअर टेकरचे काम करत होता. काल रात्री आपल्या हॉस्पिटलचे कामावरून तो आठ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला अशी माहिती त्याच्या सहकार्याने दिली. त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या हत्येने शहरात खळबळ उडाली असून आरोपीला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा , संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली. या हत्येचा अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत.