Sangli Samachar

The Janshakti News

हजारो कोटींची गुंतवणूक असणारे उद्योग संजयकाकांच्या आग्रही मागणी नुसार सांगली जिल्ह्याला देणार आहे - अमित शाहा| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. ४ मे २०२४

हजारो कोटींची गुंतवणूक असणारे उद्योग संजयकाकांच्या आग्रही मागणी नुसार सांगली जिल्ह्याला देणार आहे. तसेच हळद संशोधन केंद्र सांगलीसाठी मंजूर केले असून जिल्ह्याच्या विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे. असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी आणि सांगलीच्या विकासासाठी दिल्लीतून निधी खेचून आणण्याची गॅरंटी देणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बिटा येथील महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते. या सभेला हजोरांची गर्दी जमली होती.

अमित शहा म्हणाले, सांगली जिल्ह्यात हजारो कोटींची गुंतवणूक असणारे उद्योग संजयकाकांच्या आग्रही मागणी नुसार आम्ही आणणार आहोत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. तसेच सांगलीच्या अस्मितेची हळदीची बाजारपेठ आहे. त्यामुळे हळद संशोधन केंद्र मंजूर केले असून देशाबरोबर जगभरात सांगलीचा नावलौकिक वाहणार आहे. रोजगार वृध्दी होणार आहे.

देशाच्या विकासाची गॅरंटी देणान्या नरेंद्र मोदी यांना तिसन्यांदा पंतप्रधान करण्यासाठी, चारसी पार हा नारा खरा ठरविण्यासाठी संजयकाका पाटील यांना विजयी करा. आज या सभेत संजयकाका पाटील यांच्या विजयाची संकल्प मूठ बांधण्यासाठी मी येथे आलो आहे. संजयकाका पाटील यांना विजयी करून सांगलीची जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झोळीत टाका आणि देशाच्या जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्या.


सांगलीतील विकास कामे करण्यासाठी आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी संजयकाका पाटील यांनी माझ्या बरोबर आणि मोदी यांच्या बरोबर सुद्धा लढा दिला आहे. सांगलीचे प्रश्न पोटतिडकीने संसदेत मांडले आहेत. माझ्या पेक्षा जास्त निधी संजयकाकांनी आणला आहे. मिरज जंक्शन, सांगली रेल्वे स्टेशन आता अत्याधुनिक होणार आहे. सर्व सिंचन मोजना पूर्ण करणार आहोत. सरकारच्या सर्व योजना राबवलेल्या आहेत. असे अमित शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. एका बाजूला विकासाची गॅरंटी देणारी नरेंद्र मोदी आहेत आणि दुसऱ्या बाजूला चायनीज गॅरंटी देणारे राहुल बाबा आहेत. तुम्ही ठरवा कुणाच्या बाजूला जायचं. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आपण मोदींच्या बरोबर राहिलो पाहिजे, काश्मीर व देशाला सुरक्षित बनवणारे आणि कोट्यवधींच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या बरोबर आपण मते दिली पाहिजेत. राम मंदिराचा प्रश्न सोडवण्याची धाडस आत्तापर्यंत कोणाच्यात झाले नव्हते गेल्या कित्येक वर्षात न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित पडले होते. परंतु मोदींच्या काळात हे प्रकरण मार्गी लागले आपण लहा जिंकलो. मंदिर उभारले आणि प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सुद्धा केली. रामनवमीला जेव्हा श्रीरामांच्या कपाळावर सूर्याची किरणे पडली तेव्हा सर्वांनाच धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. परंतु काँग्रेसने आणि शरद पवार यांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. आपल्या संस्कृतीवर बहिष्कार टाकणाऱ्या या माणसांना आपण कधी जवळ केले नाही पाहिजे.

दहा वर्षापूर्वी आतंकवादी येऊन बॉम्बस्फोट करत होते. परंतु नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर एकही बॉम्बस्फोट झाला नाही. आतंकवादी शांत झाले आहेत. घर में घुस के मारेंगे या मोदींच्या तत्वामुळे आता कोणीही भारताच्या नादाला लागत नाही.

मोदीजींनी मातृशक्ती म्हणजे स्त्रीशक्तीला प्राधान्य दिले आहे. विधानसभा आणि लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण दिले आहे. ट्रिपल तलाक हटवल्या मुळे मुस्लिम महिलांनाही संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे स्त्रीशक्तीचा सन्मान झाला आहे.

कोरोना काळात लसीकरण करून लसीकरण आपल्या सर्वांचा जीव वाचवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अशा नरेंद्र मोदी यांना आपण बळ दिले पाहिजे. त्यासाठी संजयकाका पाटील यांना मतदान केले पाहिजे आणि प्रचंड मतांनी निवडून आणले पाहिजे असे आवाहन अमित शहा यांनी केले.

खासदार संजयकाका पाटील यावेळी बोलताना म्हणाले, या पुढची पाच वर्षे पूर्ण वेळ मी जनतेसाठी काम करणार आहे. २४ तास लोकांसाठी उपलब्ध राहणार आहे. या जिल्ह्याचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे. राहिलेल्या पाणी योजना पूर्ण करणे आणि या जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटवणे या पलीकडे मला आता काहीही दिसत नाही. म्हणूनच यावेळी मला मतदान करा आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहकार्य करा. असे संजयकाका पाटील म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवत कराड पालकमंत्री सुरेश खाले आमदार सुधीर गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबत जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्ष आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.