yuva MAharashtra निवृत्त पत्रकार निळकंठ जोशी यांचे निधन

निवृत्त पत्रकार निळकंठ जोशी यांचे निधन



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२४
येथील निवृत्त पत्रकार निळकंठ जोशी यांचे वयाच्या साठाव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. उद्या सकाळी अमरधाम येथे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.

जोशी यांनी दै. सांगली समाचार, साप्ताहिक आत्मविश्वास व पोलीस टाइम्स या वृत्तपत्रासाठी अत्यंत उत्कृष्टरित्या पत्रकारितेचे काम केले होते. गेले काही दिवस ते आजारी होते. दि ३ मे रोजी रात्री अकराच्या दरम्यान त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धाकट्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.