Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेसने मागे घेतलेले पाऊल यशस्वी ठरणार, की धोक्यात येणार ?



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ मे २०२४
लोकसभा निवडणूक 2024साठी भाजपविरुद्ध काँग्रेसने इतर विरोधी पक्षांसहित इंडिया आघाडी केली. दर लोकसभा निवडणुकीत 400हुन अधिक जागा लढणाऱ्या काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत मात्र एक पाऊल मागे घेत मित्र पक्षांसाठी तब्बल 101 जागा सोडल्या आहेत. काँग्रेस यंदा 328 जागांवर लढणार असून 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 421 जागांवर लढली होती. त्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत मात देण्यासाठी काँग्रेसने ही नवी खेळी केली आहे.

काँग्रेसने यापूर्वी 2019च्या लोकसभा निवडणुकीत 421 जागांवर उमेदवार उभे केले होते. यावेळी त्यांनी 52 जागांवर विजय मिळवला होता. तर 2014मध्ये 464 जागांवर निवडणूक लढवली. यावेळी 44 जागांवर विजय प्राप्त केला होता. तर त्याआधी 2009मध्ये 440 जागांपैकी 206 आणि 2004च्या लोकसभा निवडणुकीत 145 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावर्षी काँग्रेसने मित्रपक्षांना संधी देत स्वतः 328 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. असे असले तरीही ओडिसा, कर्नाटक आणि मिझोराममध्ये 2019 पेक्षा अधिक जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसने 2019मध्ये 21 जागा आपल्याकडे ठेवल्या होत्या. यावेळी मात्र सर्वच म्हणजे 28 जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले आहेत. तर ओडिसामध्येही सर्व 20 जागांवर काँग्रेस लढत आहे.


काँग्रेसने मित्रपक्षांसाठी काही राज्यांमध्ये आपल्याकडे जागा कमी ठेवल्या. 2019मध्ये काँग्रेने उत्तर प्रदेशमध्ये 67 जागा लढवलेल्या, यावेळी मात्र 17च जागा आपल्याकडे ठेवल्या आहेत. म्हणजेच तब्बल 50 जागा या मित्रपक्षासाठी सोडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2019मध्ये 40 जागा लढवल्या होत्या, यावेळी मात्र 14 जागांवर काँग्रेस लढणार आहे. तर, महाराष्ट्रात काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत युती करत 2019मध्ये 25 जागा लढवल्या होत्या. यावेळी 17 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या नव्या खेळीमुळे किती फायदा होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.