Sangli Samachar

The Janshakti News

कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात आलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या - खा. संजय काका पाटील| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ मे २०२४
आटपाडी : पाच वर्षात जनतेकडे ढुंकूनही न पाहणारे केवळ कुटुंबाच्या स्वार्थासाठी आता फिरत आहेत त्यांना अजिबात जवळ करू नका. कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात आलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन, सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी केले. आज आटपाडी तालुक्यात प्रचार दौरा केला या दौऱ्या दरम्यान आटपाडी येथे ते बोलत होते. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, रासपचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ, भाजपा जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग, माजी जिल्हा परिषद सदस्य अरूण बालटे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती विद्याताई देशपांडे स्नेहजीत पोतदार भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिल कदम डी टी पाटील श्रीरंग कदम यांच्यासह आटपाडी तालुक्यातील महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते.


संजयकाका पाटील म्हणाले, काहीजण आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात उतरले आहेत अनेक वर्षे सत्ता घरात असताना सुद्धा त्यांनी जनतेसाठी काही केले नाही परंतु आता स्वतःच्या स्वार्था करता सगळीकडे स्वतःवर अन्याय झाल्याचा पाढा वाचत फिरत आहेत तर अशा फक्त कुटुंबाच्या स्वार्थासाठी निवडणुकीपुरतं तुमच्या दारात येणाऱ्यांना जागा दाखवून द्या.