Sangli Samachar

The Janshakti News

तुळजापुर संस्थानामध्ये ८ कोटी ४३ लाखांचा भष्टाचार;



| सांगली समाचार वृत्त |
तुळजापूर - दि. १० मे २०२४
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या १९९१ ते २००९ या काळातील जवळपास ८ कोटी ४३ लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्य गुन्हे विभागाच्या अहवालानुसार तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार तुळजा भवानी मंदिर संस्थानमध्ये १९९१ ते २००९ या कालावधीत भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भाने एक याचिका दाखल करण्यात आली होती.


या प्रकरणात सहधर्मादाय आयुक्तांनी २०१० मध्ये काही आदेश केले होते. त्यात दानपेटीचा लिलाव पद्धत बंद करण्याचेही निर्देश होते. दरम्यान २०१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावरील सुनावणीवेळी खंडपीठाने वरील प्रकरणात सरकारने सी आय डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी, असे सांगितले. त्यानुसार झालेल्या चौकशीनंतर सीआयडीने २७ ऑक्टोबर २०१७ ला शासनाला ८ कोटी ४३ लाखांच्या भ्रष्टाचाराचा अहवाल पाठवला. संबंधित अहवाल हा सांखिकी अधिकारी व लेखापरिक्षणाच्या आधारे, हा अहवाल असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे, आता संबंधित विश्वस्तांवर गुन्हा दाखल होऊन कारवाईच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.