Sangli Samachar

The Janshakti News

दहावी बारावीच्या परीक्षा महागणार !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १० मे २०२४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. त्यानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट २०२४ आणि मुख्य परीक्षा- २०२५ साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे.


छपाई आणि स्टेशनरी दर वाढल्याने परीक्षा फी वाढविणे गरजेचे आहे. याबाबत अनेकदा चर्चा झाली होती. त्यानुसार काही प्रमाणात वाढ केली आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी म्हटले आहे.

अशी झाली परीक्षा शुल्कवाढ... परीक्षेचा प्रकार : २०२३-२४ / २०२४-२५
नियमित / पुनर्परीक्षार्थी : ४२०/४७०
श्रेणीसुधार : ८४०/९३०
खासगी विद्यार्थी अर्ज आणि नोंदणी : १२१०/ १३४०