yuva MAharashtra मराठी चित्रपट 'डिअर लव्ह' २४ मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शीत

मराठी चित्रपट 'डिअर लव्ह' २४ मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शीत



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ मे २०२४
ए. एस. के. फिल्म निर्मित पहिला मराठी चित्रपट 'डिअर लव्ह' येत्या २४ मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमरनाथ खराडे आणि ऋषिकेश तुराई यांनी केले असून, या चित्रपटात अमरनाथ खराडे, किरण ढाणे, यशोधन गडकरी, अभिषेक वेर्णेकर, लक्ष्मी विभूते, राहुल जगताप आदी कलाकरांनी काम केले आहे. 

या चित्रपटासाठी संगीत प्रफुल्ल-स्वप्निल यांचे असून गायक शंकर महादेवन, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, स्वप्निल गोडबोले' तर पार्श्वसंगीत साऊथ सिनेमातील ॲलन प्रितम यांनी दिले आहे. 'डिअर लव्ह' हा चित्रपट नावाप्रमाणे फक्त प्रेमकथेवर आधारीत नसून, स्वप्न, प्रेम आणि नातेसंबंध यावर बेतलेला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोकण, सांगली, सातारा परिसरात निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे. 


अमरनाथ खराडे, किरण ढाणे यांनी यापूर्वी 'लागिर झालं जी' या टी.व्ही. मालिकेत भूमिका साकारल्या आहेत, त्यानंतर त्यांनी अनेक टि. व्ही. मालिका, जाहिराती, तसेच चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तसेच ऋषिकेश तुराई यांनी वेड हा रितेश देशमुख दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट लिहिला आहे.

डिअर लव्ह चित्रपटाला आत्तापासूनच सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तरी प्रत्येकांनी सहकुटुंब सह परिवार हा चित्रपट आवर्जुन पहावा, असे आवाहन चित्रपटाचे निर्माते व नायक अमरनाथ खराडे यांनी केले आहे.