Sangli Samachar

The Janshakti News

श्रीरामलल्लाचा प्रसाद जाणार थेट श्रीलंकेतील अशोक वाटीकेत !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ मे २०२४
श्रीलंकेतील अशोक वाटीका येथे सीता माता श्रीलंका मंदिर ट्रस्टतर्फे १७, १८, १९ मे रोजी कार्यक्रम होत आहे. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ प्रचारक दिनेश चंद्रजी यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. 

प्रति १२ वर्षानंतर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी अयोध्येतील श्रीरामललाचा प्रसाद, शरयू जल, गंगा जल, सीतामातेसाठी हातमागाची साडी अशोक वाटीका येथे नेण्यात येणार आहे. या धार्मिक प्रवासामुळे भारताच्या आसपासच्या देशांमध्ये हिंदू विचारधारा आणि हिंदुत्व शक्ती मजबूत होईल, असा विश्वास दिनेश चंद्र जी यांनी व्यक्त केला आहे.


अयोध्या येथे उभारण्यात आलेले श्रीराम मंदिर व या मध्ये प्रतिष्ठापित करण्यात आलेली श्रीराम लल्लाची अत्यंत देखणी मूर्ती ही केवळ भारतवासियांचीच नव्हे तर जगभरातील श्रीराम प्रेमींची भावनिक बाब बनलेली आहे. अयोध्यात येणारे लाखो भाविक श्री रामलल्लाच्या दर्शनाने समाधान व आनंद व्यक्त करीत असतात. श्रीलंका येथील अशोक वाटिकेतील श्री सीता मंदिराच्या कार्यक्रमात श्री राम लल्ला चा प्रसाद पोहोचणे याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या निमित्ताने अयोध्येतील श्री राम मंदिर व श्री रामलल्लाची देखणी मूर्ती यांची माहिती पुन्हा एकदा जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे, याबद्दल श्रीराम भाविकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.