Sangli Samachar

The Janshakti News

चंद्रहार पाटलांचे काम करा, अन्यथा... जयंतराव आले घायकुतीला !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२४
कॉंग्रेसमधील विशाल पाटलांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील मैदानात आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारास जोरदार सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना ठणकावत माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचे काम करा,अन्यथा माझा तुम्हाला शेवटचा रामराम असेल,अशा शब्दात कार्यकर्त्यांना गर्भित इशारा दिला. 

काँग्रेसमधून विशाल पाटलांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार विशाल पाटलांच्या प्रचारात आद्यप सक्रीय दिसत नसल्याने जयंत पाटलांनी हा इशारा दिला आहे. माजी मंत्री, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांना जयंत पाटील यांनी सुनावले आहे. "स्टेजवर एक आणि खाली एक भाषा करू नका, नाही तर पंचायत होईल," अशा शब्दात जयंत पाटलांनी विश्वजीत कदम यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंच्या उपस्थित झालेल्या जाहीर सभेमध्ये जयंत पाटलांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जयंत पाटलांच्या विधानाचे समर्थन केले आहे. 

त्यामुळे कधीतरित्या पै. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी कारणीभूत असलेले जयंतराव पाटील हे गायकुकीला आले आहेत का ? असा सवाल मतदारातून विचारला जात आहे.