| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आणि आबाल वृद्धांनी त्यांच्या या बंडखोरीला पाठिंबा द्यायला सुरुवात झाली. केवळ सांगली शहरातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून विशाल पाटील यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या छोट्या मोठ्या पक्षांसह विविध संघटनांची संख्या शतकापार पोहोचली आहे. त्यामुळे विशाल पाटील यांचा विजय नक्की मानला जात आहे.
वंचित बहुजन आघाडी, दुष्काळी फोरम हे विशाल दादांचे सर्वात मोठे पाठबळ ठरले आहे. तर मिरजेपाठोपाठ जत मधील आजी-माजी नगरसेवकांनी विशाल पाटील यांचे चिन्ह घरोघरी पोहोवचण्यासाठी, पायाला भिंगरी बांधले आहे. प्रचारात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. परिणामी विशाल पाटील यांची उमेदवारी सर्वसामान्य जनतेने व कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते महाआघाडीच्या व्यासपीठावर असली तरी कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्याच प्रचारात आघाडीवर आहेत. इतकेच नव्हे तर, भाजपाचे काही कार्यकर्तेही त्यांच्या प्रचारात दिसून येत आहेत. आणि म्हणूनच विशाल पाटील यांचे बळ 100 पटीने वाढले असून. यांना संजय काकांची हॅट्रिक नव्हे, विशाल पाटील यांचा विशाल विजय निश्चित असल्याचे जनतेतून बोलले जात आहेत. प्रतीक्षा आहे ती मतदानात आघाडी किती घेणार याची.