| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२४
काँग्रेस मधून बंडखोरी केलेले विशाल पाटील हे सध्या केवळ सांगलीच्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही कारस्थानाचे बळी पडलेले विशाल पाटील, गेल्या पाच वर्षात हा जिव्हारी लागणारा पराभव विसरून सार्वजनिक कामात, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आघाडीवर होते. परंतु विरोधकांकडून " विशाल पाटील यांनी गेल्या पाच वर्षात काय केले ?" हा प्रश्न विचारला जात आहे. आणि अशा टीकाकारांना विशाल पाटील काय करीत होते ? या प्रश्नाची उत्तरं खालील व्हिडिओतून नक्की सापडतील.
एका तरुण, प्रामाणिक व काँग्रेस पक्षासाठी आपले संपूर्ण योगदान देणाऱ्या वसंतदादांच्या नातवाच्या विजयासाठी सर्वच जण प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांचा हा व्हिडिओ त्यांच्या बाबतीतील गैरसमज दूर करण्यात महत्त्वाचा ठरू शकेल. आणि त्यांना विजय पथावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरेल हे नक्की.