Sangli Samachar

The Janshakti News

तुमची माफी म्हणजे देखावा, कारवाईसाठी तयार राहा !



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - तुमची माफी म्हणजे निव्वळ देखावा आहे. आम्ही ही माफी स्वीकारणार नाही, त्यामुळे कारवाईसाठी तयार राहा अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव यांना फटकारले. सात दिवसांत शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने रामदेव यांना दिले. 


दिशाभूल करणाऱ्या आणि भ्रामक जाहिराती प्रसिद्ध केल्या प्रकरणात योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी जातीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहून माफी मागितली. मात्र न्या. हिमा कोहली आणि न्या. अमानतुल्ला यांच्या खंडपीठाने ही माफी स्वीकारली नाही. तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान करण्यात आला आहे. ही माफी म्हणजे केवळ देखावा असल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे.