Sangli Samachar

The Janshakti News

चार्जिंग दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरला आग! तुम्ही तर करत नाहीये ना ही चूक?सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
मुंबई  - छत्रपती संभाजीनगरताली छावणी परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली. समोर आलेल्या माहितीनुसार, चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतल्यामुळे ही आग लागली. या आगीत होरपळून तब्बल सात जणांनी आपला जीव गमावला आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग करत असताना आग लागल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत.

इलेक्ट्रिक स्टूटरसाठी बॅटरी नॉर्म्समध्ये बदल करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी अनेक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याच्या घटनांनंतर केंद्र सरकारने बॅटरीच्या सुरक्षेला वाढवण्यासाठी नवे नियम लागू केले होते. नवीन नियमांचं नोटिफिकेशन इलेक्ट्रिक वाहन तायर करणाऱ्या सर्व कंपन्यांना जारी करण्यात आला होते. ज्यानंतर अेक कंपन्यांनी आपल्या प्रभावित इलेक्ट्रिक स्कूटर मॉडलला बाजारत रिकॉलही केलं होतं. मात्र अजुनही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याची प्रकरणं ही चिंताजनक आहेत. यामुळे ई-वाहनांची सुरक्षा आणि विश्वासावर प्रश्न उपस्थित होत आहेत.


कशी चार्ज करावी इलेक्ट्रिक स्कूटर -

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याची अनेक कारण असू शकतात. खरंतर जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये खराब बॅटरी आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची प्रकरणं समोर आली आहेत. तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करत असाल तर त्याच्या मेंटेनेंसपासून तर चार्जिंगपर्यंत काही गोष्टींकडे तुम्हाला खास लक्ष देण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमची इलेक्ट्रिक स्कूटर सुरक्षित पद्धतीने चार्ज करु शकता.

या गोष्टी ठेवा लक्षात -

इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीला ओव्हरचार्ज करु नका. फूल चार्ज झाल्यावर पॉवर सोर्सने प्लगला डिसकनेक्ट करा.
-स्कूटर चालवल्यानंतर लगेच बॅटरी चार्ज करु नका. कारण त्यावेळी बॅटरी गरम असते. बॅटरीला 30-45 मिनिटांनंतर चार्जिंगला लावा. घराच्या इलेक्ट्रिक कनेक्शन, स्विच बोर्ड आणि वायरिंगला चांगले ठेवा जेणेकरुन शॉर्ट सर्किट होणार नाही. लक्षात ठेवा की, इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही ज्या ठिकाणी चार्जिंगला लावता त्या ठिकाणी ओलावा नसावा. बॅटरीची चार्जिंग लेव्हल मिनिमम 20 टक्के आणि मॅक्सिमम 80 टक्केपर्यंत राहिली पाहिजे.