सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
मुंबई - पुरातत्व शास्त्राचा वापर करून भारतात अनेक ठिकाणी संशोधन सुरु असते. अशातच तेलंगणा राज्यात फणिगिरी नावाची महत्वाची बौध्द पुरातत्वीय साईट आहे. येथे आता पर्यंत अनेक वेळा उत्खनन झाले व काही उत्खननांचे रिपोर्ट सुद्धा प्रकाशित आहेत. येते आजही उत्खनन सुरु आहे. याबाबत पुरातत्व अभ्यासक आशुतोष बापट यानी फेसबक पोस्ट करून धन भरलेल्या मोहोरांचा घडा मिळाल्याची माहिती दिली आहे.
आशुतोष लिहितात, "निजाम काळापासुन या जागेचे संरक्षण होणे सुरु झाले, इ.स. १९४१ ते १९४४ दरम्यान पहिल्यांदा या ठिकाणी खाजा महमद अहमद यांनी उत्खनन केले. नुकताच या ठिकाणी एका भांड्यात इक्श्वाकु काळातील जवळपास ३७०० नाण्यांचा साठा सापडला. आजच्या आंध्र- तेलंगणा भागात इ. स. तिसऱ्या- चौथ्या शतकात इक्श्वाकु राजवंशाने राज्य केले होते. साधारणतः सातवाहन साम्राज्याचा ह्रास होत असतांना इक्श्वाकु राजवंशाची स्थापना होऊन वाढ झाली. या राजांनी लिड या धातुमधे आपली नाणी टंकीत केली होती. फणिगीरी ला उत्खननात आता सापडलेली ३७००+ नाणी देखील लिड चीच आहेत. हि नाणी एका मातीच्या भांड्यात पुरलेली होती. बाहेर काढुन मोजली तर एकुण ३७३० नाणी या भांड्यात होती. या प्रत्येक नाण्याचे वजन हे साधारण २.३ ग्राम च्या आसपास आहे. इक्श्वाकु नाण्यांवर पुढील बाजुला हत्ती व मागील बाजुला उजैनी चिन्ह असते. या पुर्वी फणिगिरी ला झालेल्या उत्खननातही अशी नाणी सापडलेली आहेत पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडली नव्हती."
ते पुढे म्हणतात, "येथे यापुर्वी झालेल्या उत्खननात अनेक विविध वस्तु सापडल्या जसे विविध दगडाचे मणी, काच, बांगड्यांचे तुकडे, विविध शिल्प, खिळे आणि बरंच काही, पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेला हा नाण्यांचा साठा म्हणजे एक महत्वाचा शोध म्हणावा लागेल."