Sangli Samachar

The Janshakti News

वसंतदादांच्या नातवाला मतदार पुढच्या दाराने सन्मानाने लोकसभेत पाठवेल - विशाल दादा पाटील



| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि.२९ एप्रिल २०२४
वसंतदादा च्या नातवाला मतदार मागच्या नव्हे तर पुढच्या दाराने सन्मानाने लोकसभेत पाठवेल असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांनी मिरज तालुक्यातील बेडग येथे बोलताना व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जळतांना दिसत आहेत. विशाल पाटील यांचा मुख्य रोख आहे तो भाजपाचे विद्यमान खासदार यांच्यावरच. आपली लढाई ही महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या विरोधात नसून, मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व सांगली लोकसभा मतदारसंघातील निष्क्रिय खासदाराच्या विरोधात आहे. भाजपाने व खासदाराने समाजात भांडणे लावली, कार्यकर्त्यांची डोके फोडली, असा आरोप करून विशाल पाटील म्हणाले की संसदेत आरक्षणाच्या विरोधात समर्थपणे व पूर्ण ताकतीने बोलणारा खासदार हवा.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मलाही अनेक ऑफर आल्या, परंतु माझे बंड स्वार्थासाठी नसो जनतेच्या विकासासाठी आहे. त्यामुळे जनता मला मागच्या नव्हे तर पुढच्या दाराने संसदेत पाठवेल असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

विशाल पाटील यांच्या बेडग येथील प्रचारार्थ घेतलेला सभेत माजी मंत्री अजितराव घोरपडे, अमरसिंह पाटील, संजय हजारे, संजय मेंढे, बाळासाहेब गुमास्ते, संजय इनामदार, निरंजन आवटी, तानाजी चव्हाण आदींसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती. . विशाल पाटील यांच्या भाषणास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात, व "विशाल दादा तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है |" अशा घोषणांनी प्रतिसाद दिला. मिरज पूर्व भागातील विशाल पाटील यांच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे व माजी आमदार विलासराव जगताप यांचे या भागातील कार्यकर्ते विशाल दादांच्या प्रचारार्थ हिरीरीने सहभागी होताना दिसत आहेत.