Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील माजी नगरसेवक उतरले विशाल दादांच्या प्रचारासाठी !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२९ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली महापालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक असून, घराघरात जाऊन विशाल दादांचा प्रचार करताना दिसत आहेत.

प्रभाग क्रमांक पंधरा मधील, पाकिजा मशीद समोरील रमामाता नगर, काळे प्लॉट, माने प्लॉट, या ठिकाणी पत्रके वाटप करण्यात आले. या वेळी मा.नगरसेवक फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र वळवडे, विपुल केरीपाळे, अ‍ॅड.शहाबाज नायकवडी, अज्जू पटेल, हर्षद कांबळे, अंजर फकीर, इजाज नायकवडी, सोहेल शेख,अमीर शेख,मैनूद्दीन मुजावर, समीर बागवान,अस्लम साहेब,सतीश बनसोडे,अदी उपस्थित होते.


सांगलीतील प्रभाग क्रमांक पंधरा प्रमाणे, प्रभाग क्रमांक 16 मध्ये ही माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रचारार्थ घर आणि घर पिंजून काढत आहेत. सांगली शहरातून विशाल पाटील यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभताना दिसत आहे.