Sangli Samachar

The Janshakti News

"महायुतीत कमळाने धनुष्याला घेऊन घड्याळाचा काटा काढला,"



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि.२९ एप्रिल २०२४
राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीचा सामना होत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महायुतीतील उमेदवारांसाठी महाराष्ट्रात जाहीर सभा होत आहेत. अशातच महायुतीतील घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळाचा प्रचार केला जात आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभांच्या व्यासपीठावर घड्याळाचं चिन्ह कुठे दिसले नसल्याचं दिसत आहे. यावरून 'महायुतीत कमळाने धनुष्याला घेऊन घड्याळाचा काटा काढला', असं म्हणत शरद पवार गटाने अजित पवार गटाला डिवचलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी सभा झाली. त्यानंतर परभणीत महादेव जानकरांसाठी नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तर काल शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्यासाठी मोदींची सभा पार पडली. अशातच आता या तिन्ह सभांचा शरद पवार गटाकडून नरेंद्र मोदींची फोटो ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये व्यासपीठावर नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या बॅनरवर घड्याळाचं चिन्ह गायब असल्याचं दिसत आहे. त्यावरून शरद पवार गटाने अजित पवार गटाला डिवचलंय.

दरम्यान, "ठोस विकासासाठी महायुतीत घड्याळाला घेऊन जाणाऱ्यांची नक्की जागा कुठे? असा सवाल करत आधी रामटेक, परभणी आणि आता कोल्हापूर येथील प्रचारसभेत स्टेज, पोडीअम अशा जागोजागी कमळाने धनुष्यबाणाचे चिन्ह झळकले. पण घड्याळाचा काटा काढलेला दिसला. घड्याळ महायुतीत जाऊन चिकटलय, पण त्याचे भवितव्य आणि खरी जागा ही या सभेच्या वेळी दिसून आली. घड्याळाचा काटा बंद होण्याची आणि दादागिरीला देवगिरी सोडण्याची वेळ जवळ येऊ लागलीये का? असा खोचक सवाल देखील शरद पवार गटाने केलाय.

ठोस विकासासाठी महायुतीत घड्याळाला घेऊन जाणाऱ्यांची नक्की जागा कुठे? आधी रामटेक, परभणी आणि आता कोल्हापूर येथील प्रचारसभेत स्टेज, पोडीअम अशा जागोजागी कमळाने धनुष्यबाणाचे चिन्ह झळकले. पण घड्याळाचा काटा काढलेला दिसला. घड्याळ महायुतीत जाऊन चिकटलय पण त्याचे भवितव्य आणि खरी जागा भाजपने दाखवून दिल्याचे शरद पवार गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.