सांगली समाचार - दि. ७ एप्रिल २०२४
मुंबई - जखमा भरण्यासाठी आपण मोठ्या विश्वासाने बॅन्डेज लावतो पण तेच बॅन्डेज आपल्याला कॅन्सरच्या संकटामध्ये ढकलत आहे? नुकत्याच एका अभ्यासामध्ये समोर आलेल्या गोष्टीनुसार, अनेक बॅन्डेज मध्ये असे काही घटक सापडले आहेत ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. Mamavation ने Environmental Health News,च्या सहयोगाने केलेल्या 40 बॅन्डेज 18 वेगवेगळ्या ब्रॅण्डसचे घेतले. मात्र या बॅन्डेजपैकी 26 सॅम्पल्समध्ये fluorine हे केमिकल आढळलं आहे. हे केमिकल धोकादायक आहे.
उघड्या जखमेमध्ये रक्तातून केमिकल शरीरात जातं आणि अनेक आरोग्याशी संबंधित समस्या येतात असं समोर आलं आहे. चाचणी केलेल्या एकूण पट्ट्यांपैकी 65% PFASहे “forever chemicals" आहेत. खुल्या जखमांवर पट्ट्या लावल्या जात असल्याने, लहान मुले आणि प्रौढांना देखील पीएफएएसच्या संपर्कात आणले जात आहे. डेटावरून हे स्पष्ट आहे की जखमेच्या काळजीसाठी PFAS ची आवश्यकता नाही, त्यामुळे PFAS पासून संरक्षण करण्यासाठी त्याला काढून टाकणे आणि त्याऐवजी PFAS-Free मटेरिअलची निवड करणे आवश्यक आहे. Dr. Linda S. Birnbaum, या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि National Institute of Environmental Health Sciences and National Toxicology Program,च्या माजी संचालकांनी तिची चिंता व्यक्त केली, असे सांगितले.
बॅन्डेज मध्ये PFAS का वापरली जातात?
Mamavation,च्या माहितीनुसार PFAS chemicals ही बॅन्डेज मध्ये वापरण्याचं प्रमुख कारण म्हणजे ती याच्या मदतीने वॉटर प्रुफ केली जातात. मात्र यामुळे वाढ, पुनर्निर्मिती, लठ्ठपणा, अनेक कॅन्सर यांचा धोका वाढतो. PFAS हे आग, तेल, ग्रीस, पाणी याचा परिणाम त्याच्यावर होऊ देत नसल्याने बॅन्डेज अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे सर्रास त्याचा वापर नॉन स्टिक कूकवेअर, फूड पॅकेजिंग़ मध्ये केला जातो. PFAS chemicals ला “forever chemicals” असंही ओळखलं जातं. त्याचं डिग्रडेशन लवकर होत नसल्याने लोकांच्या त्वचेवर अधिककाळ राहतात. मात्र सतत वापरल्यास त्याचा आरोग्याला धोका असतो.