Sangli Samachar

The Janshakti News

जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देणार



सांगली समाचार -  दि ७ एप्रिल २०२४
मुंबई  - सांगलीसह आता भिवंडीच्या जागेवरूनही कॉंग्रेसने मित्र पक्षांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सूरुवात केली आहे. भिंवडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाने बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भिवंडीतील स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. यातच भिवंडीची जागा मिळाली नाही तर कॉंग्रेस पदाधिकारी राजीनामा देतील. अशा इशाराच महेंद्र थोरवे यांनी दिला आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत पेच वाढतच चालला आहे.

भिवंडी मतदारसंघ हा कॉंग्रेस ठणकावून सांगितलं आहे. जर ही जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देतील. याची सुरूवात भिवंडीपासून होईल. असे महेंद्र थोरवे यांनी सांगितलं आहे. तर दयानंद चोरघेंनी अर्ज भरावा, असा ठराव देखील यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे याठिकाणी आता पुढील काही दिवसात काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


दरम्यान, भिवंडीत लोकसभेतून महायुतीकडून कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातील बाळ्या मामा म्हात्रे यांना संधी देण्यात आलीय. मात्र या जागेसाठी कॉंग्रेस आग्रही असून त्यांनी आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला सांगलीत देखील हेच चित्र असून कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी तर थेट इशाराच दिलाय.