yuva MAharashtra पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातच येतयं तीन दिवसांआड पाणी

पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातच येतयं तीन दिवसांआड पाणी



सांगली समाचार - दि. ३ एप्रिल २०२४
धरणगाव - पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी (ता. धरणगाव) गावास टंचाईचे चटके अनेक वर्षे बसत आहेत. गावात अनियमित व अनेक दिवसांनी पाणीपुरवठ्याची समस्या होती. त्यात अलीकडे ही समस्या दूर करण्यासंबंधी कार्यवाही झाली आहे. परंतु तरीदेखील तीन दिवसाआड या गावास पाणीपुरवठा होणार आहे, असे दिसत आहे.

चौदा दिवसांनीच नंबर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत २२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. त्या कामाची नुकतीच अधिकारी व अन्य मंडळीने पाहणी केली. तसेच योजनेची संपूर्ण माहिती घेतली. यामध्ये कांताई बंधारा येथून बारा किलोमीटरची जलवाहिनी केली आहे. अशुद्ध पाणी पंपिंगसाठी ५० अश्वशक्तीचे तीन नग बसविण्यात आले असून,


अपेक्षित असलेल्या गावांपेक्षा कमी अपेक्षित गावात पाणीटंचाई

जलशुद्धीकरण केंद्र चार 'एमएलडी'चे आहेत. शुद्ध पाणी पंपिंग मशिनरी १५ अश्वशक्तीचे तीन नग बसविण्यात आले आहेत. तीन नवीन जलकुंभ देखील तयार केले आहेत. अशा या अत्याधुनिक पाणीपुरवठा योजनेची आज पाहणी केली असून, पाळधीवासियांसाठी पाणी दर तीन दिवसांआड मिळणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

पाळधीची लोकसंख्या २५ हजारांवर आहे. धरणगगावातील मोठे गाव म्हणून पाळधीची ओळख आहे. परंतु पाळधीत सतत टंचाई असते, असा मुद्दा ग्रामस्थ, नागरिक उपस्थित करायचे. त्यावर प्रशासनाने प्रयत्न करून ही योजना आणली आहे. यातून किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.