Sangli Samachar

The Janshakti News

वीराचार्य पतसंस्थेने शून्य टक्के एनपीएची आपली अखंड परंपरा कायम ठेवली !सांगली समाचार - दि ३ एप्रिल २०२४
सांगली -संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृश्य वातावरण असताना, ऊस, द्राक्ष उत्पादनात, दरातील घसरणीसारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सभासद, ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चालू आर्थिक वर्षात संस्थेस ७ कोटी २० लाखांचा ढोबळ नफा झालेला आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री. एन. जे. पाटील यांनी दिली.

संस्थेने गत आर्थिक वर्षामध्ये व्यवसायामध्ये १०७ कोटीची वाढ करीत एकत्रित ६५९ कोटी व्यवसायाचा टप्पा पार करीत आहे, या वैभवशाली अर्थपूर्ण कामगीरीतीलयोगदानाबद्दल चेअरमन श्री. एन. जे. पाटील यांनी सर्व सभासद ग्राहकांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. संस्थेचे मार्गदर्शक संचालक श्री. शशिकांत राजोबा, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेनच्या महासचिव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेची निरंतर प्रगती पथाकडची वाटचाल सुरू आहे. संस्थेकडे एकूण ३७९ कोटी ४८ लाख ठेवी असून २७९ कोटी ७१ लाखाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल ११ कोटी ६१ लाखाचे झाले असून सी डी रेशो ६७.६०% इतका संतुलित आहे. एकूण स्वनिधी ४० कोटी ६३ लाखाचा झालेला आहे. संस्थेने शिल्लक रक्कम विविध बँकामध्ये १६८ कोटी ९७ लाख गुंतवणूक केली आहे.


अनेक अडचणींच्या पार्श्वभुमीवर कर्जदार सभासदांनी केलेल्या उदंड सहकार्यामुळे वसुली सक्षम रीत्या होवून थकबाकी कर्ज वसुली ९७.१८% इतकी झालेली असून ३१ मार्च रोजीच शुन्य टक्के एन पी ए ची परंपरा सलग सातव्या वर्षीही कायम राखण्यात संस्थेस यश आले आहे. वर्षाअखेर संस्थेस ७ कोटी २० लाखाचा ढोबळ नफा झालेला आहे. संस्था सांगली जिल्हा कार्यक्षेत्र घेवून कार्यरत असून २५ शाखांच्या माध्यमातून कार्य विस्ताराबरोबर ग्राहक सेवेचा नवा मापदंड घालून अत्याधुनिक सोयी सुविधेसह विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून संस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. संस्थेच्या या विकासात्मक वाटचालीमध्ये व्हा. चेअरमन श्री. मनोज मिलवडे, तसेच सर्व संचालक, सल्लागार सदस्य सभासद ग्राहक व व्यवस्थापक श्री. शितल मसुटगे, यांचेसह सर्व सेवकांचे योगदान लाभत आहे.