Sangli Samachar

The Janshakti News

खांदा उद्धव ठाकरेंचा, गोळी मारणारा चंद्रहार पाटील, बळी विशाल पाटलांचा! अजित पवार गटाचा रोख नेमका कोणावर?
सांगली समाचार -  दि  ६ एप्रिल  २०२४
सांगली  - सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. या जागेसाठी आमदार विश्वजित कदम यांनी प्रतिष्ठा पणाला लावत पार गल्ली ते दिल्ली भेटींचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. आता त्या जागेवरून अन्य ठिकाणी मिठाचा खडा पडणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद-विवाद सुरू असताना जाता या वादामध्ये अजित पवार गटाने सुद्धा उडी मारली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा रोख नेमका कोणावर? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.


अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सांगलीच्या जागेवरून सुरु असलेल्या वादावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागताना खोचक शब्दांमध्ये ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चंद्रहार पाटील यांच्या हाताने विशाल पाटील यांना गोळी मारायला लावणाऱ्याला मानलं पाहिजे.खांदा उद्धव ठाकरेचा,गोळी मारणारा चंद्रहार पाटील,बळी विशाल पाटलांचा...