Sangli Samachar

The Janshakti News

उत्खननात सापडलं 'सोन्याचं शहर', पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२३ एप्रिल २०२४
इतिहासातील गोष्टी आणि पुरातन संशोधनासाठी बऱ्याच ठिकाणी उत्खनन केलं जातं. मग उत्खननात अनेक वेगवेगळ्या गोष्टी सापडतात जे पाहून चकित व्हायला होतं. आत्तापर्यंत अशी अनेक उत्खनने झाली असून बऱ्याच थक्क करणाऱ्या गोष्टी वस्तू सापडल्या आहेत. अशाच एका उत्खननात चक्क सोन्याचं शहर सापडलं आहे. इजिप्तच्या उत्खननामध्ये हे सोन्याचं शहर सापडलं आहे. येथे झालेल्या उत्खननात 3 अनोख्या गोष्टी सापडल्या. याचे फोटोही समोर आले आहेत. हजारो वर्षे जुन्या गोष्टी सापडल्या असून जेव्हा शास्त्रज्ञांनी या गोष्टी शोधून काढल्या तेव्हा त्या काळातील लोकांना विज्ञानाबाबत एवढं माहित होतं हे जाणून तेही थक्कच राहिले.


द सन वेबसाइटनुसार, एप्रिल 2021 मध्ये, इजिप्शियन पुरातन वास्तू मंत्रालयानं याविषयी सांगितलं. त्यांनी केलेल्या निवेदनात, राइज ऑफ एटेन नावाचे एक प्राचीन शहर शोधल्याचं सांगितलं. हे शहर सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी राजा आमेनहोटेप III च्या काळात बांधले गेले. इजिप्शियन मोहिमेदरम्यान लक्सरजवळ त्याचा शोध लागला. याला लक्सरचे गोल्डन सिटी देखील म्हटले जाते. इजिप्तमध्ये सापडलेल्या प्राचीन शहरांपैकी हे सर्वात मोठे आहे. अबू सिंबेल हे इजिप्तमधील एक ठिकाण असून ज्यामध्ये दोन रॉक कट मंदिरे आहेत. ज्यात दगडी बांधकामे आहेत. हे देखील प्राचीन इजिप्तचे आहेत. 13 व्या ईसापूर्व रामेसेस II च्या काळात बांधले गेले. या मंदिरात गूढ खोल्या होत्या ज्यातून सूर्यप्रकाशाची किरणे वर्षातून दोनदा राजाच्या मूर्तीला प्रकाशमान करायची. हे ठिकाण प्रथम 1817 मध्ये शोधलं गेलं होतं मात्र 1960 मध्ये हे संपूर्ण कॉम्प्लेक्स काढून टाकण्यात आले आणि उच्च उंचीवर पुन्हा बांधण्यात आलं कारण तेथे धरण बांधले गेलं. इजिप्तचा सर्वात प्रसिद्ध राजा तुतानखामनचा मकबरा ज्याने 3 हजार वर्षांपूर्वी, 1332 ते 1323 दरम्यान राज्य केलं. जेव्हा तो सिंहासनावर बसला तेव्हा फक्त 10 वर्षांचा होता.