Sangli Samachar

The Janshakti News

राऊत साहेबांना सांगा, "बुंद से गये वो हौद से नही आती"




सांगली समाचार - दि. ८ एप्रिल २०२४
सांगली - अकबर बिरबलाच्या अनेक कथांतून आपल्याला बोध मिळतो. अशीच एक कथा सर्वश्रुत आहे " जो बुंद से गया वो हौद से नही आता" ही ती कथा... असाच प्रकार शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्या बाबतीत घडला. राऊत यांनी नुकताच केलेला सांगली दौरा त्यांच्या वादग्रस्त स्वभावामुळे व वक्तव्यामुळे चांगलाच गाजला. समेट घडवायला आलेल्या राऊतांमुळे काँग्रेस शिवसेनेतील दरी आणखीनच वाढली.

राऊत यांना याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी या जखमांवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. ते थेट कडेपूर येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात असलेल्या पतंगराव कदम यांच्या समाधीस, कवठेमंकाळ येथील आर आर आबा पाटील यांच्या समाधीस आणि पलूस येथील लाड यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून वरील मंडळीं बाबत कौतुकोद्गार काढले. परंतु तत्पूर्वी राऊत यांच्या वाक्बाणाने घायाळ झालेली मने अशी थोडीच साधणार आहेत ?...


पण वरील अकबर बिरबलाच्या कथेवरून बोध घेतील तर ते राऊत कसले ?... एकीकडे दिवंगत नेत्यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहिल्यानंतर सांगलीत आणि त्यानंतर मुंबईत जाऊन त्यांनी काँग्रेसच्या राज्य व सांगली जिल्ह्यातील नेत्यांच्यावर गरळ ओकली. त्यावरून असेच म्हणावे लागते "हम नही सुधरेंगे !"